Breaking News

लष्करी शस्त्रे बनवणाऱ्या जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये ३ भारतीय कंपन्या शस्त्रास्त्र विक्रीत अनुक्रमे १.५ टक्के आणि ४ टक्क्यांनी वाढ

मराठी ई-बातम्या टीम
लष्करी शस्त्रे बनवणाऱ्या जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये ३ भारतीय कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत भारत वेगाने लष्करी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचा परिणाम म्हणून भारतातील ३ कंपन्यांनी जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. स्वीडिश थिंक-टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी यांचा टॉप १०० कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत जगभरातील लष्करी उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. स्वीडिश थिंक-टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) ४२ व्या क्रमांकावर तर भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat Electronics) ६६ व्या क्रमांकावर आहे. या कंपन्यांच्या शस्त्रास्त्र विक्रीत अनुक्रमे १.५ टक्के आणि ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विक्री १.७% वाढली
अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२० मध्ये भारतीय शस्त्रे निर्माण करणाऱ्या कंपन्यांची (६० व्या क्रमांकावर) शस्त्र विक्री ०.२ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय कंपन्यांची एकूण शस्त्र विक्री ६.५ अब्ज डॉलर (सुमारे ४८,७५० कोटी रुपये) आहे, जी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १.७% वाढली आहे. इतकेच नाही तर हा आकडा टॉप १०० कंपन्यांच्या एकूण (विक्री) १.२% आहे.
अमेरिका आघाडीवर
शस्त्रं आणि लष्करी उपकरणं बनवण्यात चीन आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. लष्करी उपकरणे तयार करण्यात अमेरिका आघाडीवर आहे. अहवालात म्हटले आहे की, १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक ४१ कंपन्या आहेत. त्यांची एकूण शस्त्र विक्री २८५ अब्ज डॉलरची झाली आहे. शस्त्र विक्रीत २०१९ च्या तुलनेत १.९% वाढ झाली आहे.
चीनच्या ५ कंपन्यांना स्थान
शस्त्रे निर्माण करणाऱ्या चीनमधील ५ कंपन्यांचा टॉप १०० मध्ये समावेश आहे. वर्ष २०२० मध्ये या कंपन्यांची एकूण शस्त्र विक्री ६६.८ अब्ज डॉलर होती, जी २०१९ च्या तुलनेत १.५% अधिक आहे. एकूण १०० कंपन्यांच्या शस्त्रास्त्र विक्रीपैकी चीनचा वाटा १३% आहे.
आयात बंदी
देशात झालेल्या खरेदीमुळे भारतीय कंपन्यांना कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला नाही. २०२० मध्ये भारत सरकारने देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी १०० हून अधिक लष्करी उपकरणांच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *