Breaking News

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार असून त्यानंतर १२ वी च्या वर्षातील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पाहुन अंतिम गुण देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३०-३०-४० असा फॉम्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरमार्फत दिली.

त्याचबरोबर मुल्यांकन नेमके कसे होणार याची सविस्तर माहिती असणारा शासन निर्णयही आज जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बारावीच्या निकालाचे मुल्यमापन करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. २०१९ मधील विषयनिहाय लेखी, तोंडी आणि  प्रात्यक्षिकाचे अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारीत करण्यात आले आहे. यात मिळाले गुण कायम ठेवण्यात येतील, असे शासनाने म्हटले आहे. शासनाने यासाठी ३०:३०:४० असा फॉर्म्युला ठरवला आहे.

शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेतील गुण, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार ठरवले जातील. परीक्षेसाठी निर्धारीत एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील, ३० टक्के गुण अकरावीच्या परिक्षेतील, तसेच ४० टक्के गुण बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनावर आधारीत राहणार आहेत.

त्याचबरोबर १० वी तील प्रमुख ३ विषयातील गुणांवर आधारीत १२ वीच्या तीन विषयात मार्क दिले जाणार आहेत. याशिवाय ११ वी च्या निकालावर आधारीत गुणांचा समावेश करण्यात येणार आहे. १० आणि ११ च्या गुणावर आधारीत ३०-३० टक्क्यांचा फॉम्युला निश्चित करण्यात आला. तर ४० टक्के हे १२ वीतील विद्यार्थ्याच्या लेखी मुल्यांकनावर गुण देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने आपल्या निर्णयात जाहीर केले.

मुल्यांकनाची पध्दत जाणून घेण्यासाठी सोबत असलेला शासन निर्णय वाचावा-

Check Also

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *