Breaking News

११ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु: जॉंईनींगसाठी या संकेतस्थळावर नाव नोंदवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत असले तरी शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले. त्याचधर्तीवर आता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत शिक्षण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या क्लासेस उद्या सोमवारी २ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

११ वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी covid19.scertmaha.ac.in/eleventh  या संकेतस्थळावर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या संकेस्थळाच्या माध्यमातून ११ वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Check Also

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *