Breaking News

१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद

मुंबई: प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला टर्निंग पाँईट देणारे दरवर्षी १० वी आणि १२ वीचा परिक्षेचा निकाल जाहीर दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने जाहीर होतात. मात्र गेल्या काही काळात या दोन्ही परिक्षेचा निकाल जाहिर होण्याच्या वेळेपासून चार तास, पाच तास संकेतस्थळच हॅग होण्याचे प्रकार वाढीला लागल्याने उत्सुकते आणि अधिरपणे १० वी चा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर जाणाऱ्या पालक आणि विद्यांर्थ्यांना उत्सुकतेवर विरजण पडत आहे. दरवर्षी होणारी अडचण माहीत असूनही तंत्रज्ञानाने अद्यावयत करण्याकडे राज्य सरकार कधी शहाणे होणार असा सवाल आता १० वीच्या पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शुक्रवारी १ वाजता १० वी विद्यार्थ्यांचा मुल्यांकनाचा निकाल जाहिर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यानुसार पहिल्यांदाच मुल्यांकन पध्दतीने निकाल जाहिर करण्यात येणार असल्याने उत्सुकतेपोटी लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही १० वीच्या निकालाच्या संकेतस्थळावर भेटी देण्यास सुरुवात केली. परंतु काही केल्या संकेतस्थळ सुरु व्हायला तयार नव्हते. त्यामुळे उत्सुकते पोटी संकेतस्थळावर जाणाऱ्या विद्यार्थी-पालकांच्या आनंदावर पाणी पडत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाह्यला मिळत होते.

अखेर चार तासानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संकेतस्थळाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ही अडचण आल्याचे सांगत अर्ध्यातासानंतर संकेतस्थळ पूर्ववत होवून निकाल पाहता येणार असल्याचे सांगितले.

पाटील यांनी दिलेल्या वेळेच्यानंतरही अद्याप वेबसाईट सुरु झालेली नसल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही आता निकाल पाहण्यातील उत्सुकता मावळत चालली असून पुढे काय करायचे असा प्रश्न भेडसावत असल्याची खंत एका पालकाने व्यक्त केली.

दरवर्षी यापध्दतीच्या अडचणीला पालक आणि विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. तरीही शिक्षण विभागाकडून निकालाची वेबसाईट त्या क्षमतेच का बनविली जात नाही असा सवाल अनेक पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून हॅग असलेले सरकार आम्हा विद्यार्थ्यांचे भवितव्यही हँग करू पहात आहे का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यासंदर्भात मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून फोन, एसएमएसला कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही.

दरम्यान, राज्याचा १० वी निकाल ९९.९५ टक्के इतका सर्वाधिक लागला असून १५ लाख ७४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९९.९६ टक्के मुलींनी तर ९९.९४ मुले उत्तीर्ण झाली आहेत. १०० टक्के गुण ९५७ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत तर ४ हजार ९२२ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत.

Check Also

नरिमन पाँईटमधील एका टॉवरमध्ये ठरतात महाविकास आघाडीची धोरणे पुणे-मुंबईतले दोन उद्योजक, काही आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत होते बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कामकाज चालवित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *