Breaking News

१० वी- १२ वी ची परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच होणार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार असून ऑनलाईन परीक्षा घेणे सध्या तरी बोर्डाला घेणे शक्य नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून आले.
राज्यात दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नसल्याचे एकमेव कारण म्हणजे आजही राज्यातील ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधांचा अभाव आहे. तसेच जर राज्यात एकाच वेळी इतक्या विद्यार्थांची परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नसल्याचे बोर्डाचे मत आहे. तसेच ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर पुन्हा सर्व तयारी करावी लागेल. या प्रक्रियेला वेळ लागला तर मागील वर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होऊल याचमुळे बोर्ड सध्या ऑनलाईन परीक्षा घेण्यास अनुकुल नाही. दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३१ लाख इतकी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी येऊ शकतात. त्यातच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या ग्रामीण भागात आहे. सध्या शहरी भागातही इंटरनेटचा वेग मंदावल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा तांत्रिक अडचणीची व गैरसोयीचे ठरू शकते असे सांगण्यात येत असल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात सध्या दहावीचे १६ लाख, तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहे.
१० वी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २०मे २०२१ या कालावधीत होणार
दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Check Also

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *