मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने क्लासेस सुरु होण्यासही बराच उशीर झाल्याने सर्वच विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नियोजित फेब्रुवारी, मार्च महिन्यात नियमित होणाऱ्या परिक्षा १० वी, १२ वी परिक्षा यावर्षी होणार नाहीत.
त्यामुळे यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि इयत्ता १० वी ची परीक्षा ही येत्या १ मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. त्याचबरोबर आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.
