Breaking News

एफआयआरच्या माध्यमातून त्रास देण्याचे थांबविणे ही आपली गरज लेखन: स्वामिनाथन एस. अंकलेसरीया अय्यर

देशात आपल्या प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना शांत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कायद्यातील अनेक तरतूदींचा गैरवापर केला आहे. सोशल माध्यमातून किंवा अन्य उच्च दर्जाच्या माध्यमातून ट्रोल करणे, शोषण करणे, बलात्काराच्या धमक्या देणे आदी तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीत अशा पध्दतीचे तंत्र वापरणारा भाजपा एकमेव पक्ष ठरू शकतो, मात्र त्यासाठी इतर सर्वजण दोषी आहेत.

प्रतिस्पर्धी आणि आपल्या टीकाकारांचे दमण करण्यासाठी हे परंपरागत असले तरी आता हे एक नवे सहाय्यकारी तंत्र बनले आहे. सिव्हील राईट्स कार्यकर्त्या राणा अयुब यांना फक्त भाजपाची सरकारेच लक्ष्य करत नाहीत तर त्यांना अनेक व्यक्तींकडून, संस्थाकडून वैयक्तिकस्तरावर लक्ष्य केले जात आहे. अयुब यांच्या विरोधात अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण दैनंदिन जीवन कायदेशीर गुन्ह्यांनी भरून जात असून त्यांचे दैंनदिन जीवनातील कार्यकर्त्येपण अशक्त होत आहे. अशा पध्दतीच्या तंत्रामधून आपल्या विरोधात असलेल्या विचार-मतभिन्नतेला ठार मारले जाण्याचा हा एकच धोका असून तो एखाद्या वणव्याप्रमाणे पसरण्याची शक्यता आहे.

जून महिन्यामध्ये राणा अयुब यांनी एक व्हिडिओ रिट्विट केला होता, त्यामध्ये एक हिंदू जमाव मुस्लिमाला त्रास देत होते. मात्र हिंदू आयटी सेल नामक संघटनेने अयुब यांच्या विरोधात कोविड मदतीसाठी जमा केलेल्या पैशाचा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. या सेलच्या अनेक सदस्यांनी हिंदूइझम वाचविण्याची शपथ घेतली असून अशांच्या विरोधात पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्याचे नवे तंत्र त्यांनी सुरु केले आहे.

यासंदर्भात कार्यकर्ता फिल्ममेकर असलेले गौतम सुब्रमण्यम म्हणतात, आज काल कोणीही पोलिस ठाण्यात जातो आणि तक्रार दाखल करतो. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा कमकुवत आणि मुलतत्ववादी असलेल्या संघटनांना मजबुत करण्याचे आणि त्यांच्या दृष्कृत्यावर पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यासाठी केल्या जातात. आता ही पध्दत एकप्रकारे दबावतंत्रांचे हत्यार बनत आहे.

तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील दखलपात्र गुन्हा या शब्दाखाली वॉरंटशिवाय कोणालाही अटक होण्याची शक्यता असते. या दखल पात्र गुन्हा नोंदीमुळे आणि त्या अनुषंगाने लावलेल्या कलमामुळे दोन समुदायात तणाव आणि धार्मिक भावना दुखावल्याचे वातवारण निर्माण होवू शकते. जर आरोपीच्या बाजूने सत्ताधारी पक्ष असेल तर अपार त्रास निर्माण होतो.

स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारूखी यांनी हिंदू देवतांचा अवमान केला म्हणून त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. तसेच त्यांच्या विरोधात देशातील अनेक भागात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याचबरोबर अॅमेझॉन प्राईमवरील तांडव या सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून सीरीजच्या दिग्दर्शक आणि कलाकारांच्या विरूध्द अशाच देशभरात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी या सीरीजमधील कलाकारांनी सदरचे कृत्य हे त्यामधील सीरीजच्या व्यक्तीरेखेने व्यक्त केलेल्या भावना असल्याचा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्या कलाकारानाच एकप्रकारे जबाबदार धरणे हे दुर्दैवी आहे.

हे आपल्याला कुठे नेवून ठेवणार आहे? एकदा न्यायालयाने मुबलक प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र दिल्यानंतर अनेक खटल्यांमध्ये त्यावर निर्बंधही लावले आहेत. परंतु आता न्यायालये कोणत्याही गोष्टीची दखल घेताना दिसून येत असून त्यात धार्मिक भावना दुखावणे, जरी एकाच धर्मिय म्हणून जसे की हिंदूमध्ये एकच भावना असणे हा सर्वातर्थाने खोटेपणा आहे.

हिंदूइझम हे अनेक तत्वज्ञानाने आणि विचारधारांनी बनलेले आहे. त्यामुळे आज जे काही चित्र उभे आहे ते हिंदू एक या भावनेतून म्हणून नव्हे तर ती अनेकविधतेमुळे उभे आहे. हिंदू धर्मियांमधील प्रत्येक समुदायात दुखवणाऱ्या कल्पना आहेत. जर प्रत्येकजण दुखावला गेला तर प्रत्येकजण दोषी ठरेल आणि त्या प्रत्येकाला एकमेकांच्या भावना दुखाल्या म्हणून अटक करून जामिनाशिवाय तुरूंगात त्याला टाकावं लागेल. हे वेडगळपणाचे लक्षण वाटतंय ना? होय. पण न्यायालयांकडून अशा संकुचित विचारधारांच्या संघटनाना संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधी म्हणून स्विकारणे हे अशा तार्किक आधारातून सिध्द होत आहे.

अशाच पध्दतीच्या दुखावणाऱ्या भावनांना पुष्टी देणाऱ्या बाबी इतर धर्मातही आहेत, मुस्लिम धर्मियांमधील शिया, सुन्नी आणि अहमदीया पथांमध्ये दिसून येते. शिया आणि सुन्नी पंथीयांनी एकमेकांना मारल्याच इतिहास शतकांपासूनचा आतापर्यतचा आहे. इमाम हुसेन यांच्या श्रेष्ठत्वाच्या मुद्यावरून सर्व सुन्नी समुदायातील लोकांनी शिया पंथियांच्या भवाना दुखावल्या म्हणून तुरुंगात टाकता येते का?

प्रत्येक धर्म आणि धर्मातील पंथाकडून स्वत:च्या प्रथा-परंपरां आणि विश्वास श्रध्दांकडे श्रेष्ठत्वाच्या नजरेने पाहिजे जाते तर इतरांच्या प्रथा-परंपरा आणि विश्वास श्रध्दांकडे अविश्वासाच्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे एका एकाच धर्मियांमधील एका पंथामुळे दुसऱ्या पंथाच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातात. यावर एकच आदर्शवादी किंवा सर्वसमावेशक नजरेने पाहिले तर एकमेकांकडे आदराने पाहणे हे विरोधभास ठरते. यावरील नेमके उत्तर शोधायचे झाले यासाठी कायदेशीर मार्ग निवडण्याऐवजी होणाऱ्या टीका सहन करणे हेच आहे. परंतु काही संकुचित विचारधारेचे लोक संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधी म्हणून दावा करत सर्व देशभरात गुन्हे नोंदवितात.

यातून पुढे जाण्याचा मार्ग काय? माझ्या विचारानुसार लिबरल आणि विरोधी विचारधारेच्या लोकानी त्यांच्या मुलतत्ववादी विचाराच्या व्यक्तींबरोबर एकदा चर्चा करावी. लिबरल विचाराच्या हिंदूंनी हिंदूत्व पध्दतीच्या पोशाखामुळे त्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ म्हणून हजारो गुन्हे दाखल करू शकतात. तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांकडून त्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून अनेक गुन्हे दाखल कर शकतात. त्यामुळे दोन धर्मियातील तणाव संपविण्यासाठी आपापल्या धर्मातील दुसऱ्या पंथाच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत दुसऱ्या धर्मियांच्या विरोधात नाही.

सुरक्षितता ही नंबरामध्ये असते या कारणामुळे टीकाकारांनी हजारो जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवू शकतात जेणेकरून प्रत्येकाला अटक करणे अशक्य होईल. तसेच लिबरल पध्दतीने राज्यभरात गुन्हे दाखल करावेत जेणेकरून निदर्शने मोडून काढता येतील. या पध्दतीच्या परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर दाखल गुन्ह्यांचे गैरप्रकार तपासण्यासाठी न्यायालये नवी मार्गदर्शक तत्वे पुढे आणतील, तसेच फक्त जे खरेच गंभीर परिणाम असलेल्या गुन्ह्यांवर कारवाई होईल. त्यामुळे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे प्रकार तपासले जातील. हि गोष्ट करणे पुरेशी नसली तरी एका मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

(प्रसिध्द विचारवंत स्वामिनाथन एस. आणि अंकलेसरीया अय्यर यांचा हा लेख असून रविवारच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झाला आहे. त्याचा हा अनुवाद)

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *