Breaking News

अजित पवारांच्या प्रश्नाला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून होकार बीडमधील ७३१ शेतकऱ्यांना १ रूपये २ रूपयाची नुकसान भरपाई

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने पीक विमा काढण्यात आला. मात्र या पीक विमापोटी विमा कंपन्यांना पैसे मिळाले. परंतु शेतकऱ्यांना १ रूपये, २ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत केवळ ५ -१० टक्के बोगस शेतकऱ्यांमुळे संपूर्ण शेतकऱ्यांनाच तुम्ही कोणत्या आधारावर गुन्हेगारांच्या यादीत टाकणार का? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला. यावर सत्ताधारी बाकावरील अनेक सदस्यांनी अजित पवारांच्या प्रश्नावर दादा तुमचा सवाल बरोबर आहे असा प्रतिसाद देत पहिल्यांदाच अजित दादांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

विधानसभेत २९३ अन्वयेखाली राज्यातील शेतकरी, कर्जमाफी, विमा नुकसान भरपाई यासह अन्य विषयांवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीठ आदी गोष्टींमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. हे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून सरकारने पीक विमा योजनेखाली अनेक शेतकऱ्यांचा विमा राज्य सरकारने काढला. मात्र या विम्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यावर सत्ताधारी बाकावरील अनेक सदस्यांनी अजित पवारांच्या या आरोपवजा प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

अजित पवारांच्या खोपरखळ्यांनी सत्ताधारी हैराण

विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसलेल्या भाजपच्या सदस्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, निवडणूका झाल्या. त्या निवडणूकांमध्ये दाबल बटन की कमळ, दाबलं बटण की कमळ अशी परिस्थिती होवून जिकड-तिकड कमळाबाई आली. एकद-दुसऱ्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आली. पण तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की तुम्ही इथे सगळे बसलात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळे. त्यामुळे पुढच्यावेळी यातील अनेकजण दिसणार नाहीत.

यावर भाजपचे योगेश सागर यांनी विरोधकांमधील एकही जण दिसणार नसल्याचे प्रतित्तुर अजित पवारांना दिले. त्यावर अजित पवार यांनी जनता जनार्दन ठरवेल कोणाला काय द्यायचे त्याची भविष्यवाणी तुम्ही करू नका. मी माझ्या ताकतीच्या जीवावर बारामतीमधून निवडून येतोय. त्यासारखे मोदींच्या नावावर निवडून येत नसल्याचे सांगत सागर यांना शांत केले. मात्र अजित पवारांच्या या टोलेबाजीवर सभागृहात चांगलीच खसखस पिकली.

यापाठोपाठ भाजपचेच अतुल भातखळकर यांनीही अजित पवार यांना भाषण करताना मध्येच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार यांनी भातखळकर तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात. तुम्हाला जे म्हणायचेय ते एकतर टीव्हीवर सांगा अन्यथा इथे परवानगी घेवून सांगा असा खोचक सल्ला देताच सभागृहात एकच हशा उसळला.

तुम्ही चुनावी जुमले करता, त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास लोकांचा उडत चालला आहे. तुम्हाला उमेदवार मिळत नसल्याने तुम्ही मनसेवाल्याला या, शिवसेनेवाल्याला या, आमच्यातल्यांना या असेच तुमचे चाललेय. आमच्याक़डच्यांना नेवूनच तुमची पोट फुगत चालली आहेत. एकदिवशी पोट फुटेल असा उपरोधिक सल्ला दिला. आज तुमच्या मागे बसलेले आहेत. तेच तुमच्यासोबत राहतील एकदा सत्ता येवू द्या नाही तुमच्यासोबत पुढे बसले आहेत ते परत आमच्याकडे येणार नाही आले तर माझे नाव अजित पवार नाही असे सांगत राज्य सरकारला सर्व प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *