Breaking News

Recent Posts

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, … नरेंद्र मोदींना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही?

मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

आदित्य बिर्लाच्या आता दोन कंपन्या होणार

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (ABFRL) च्या संचालक मंडळाने मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल बिझनेस (MFL बिझनेस) चे ABFRL कडून नव्याने अंतर्भूत कंपनीमध्ये विलग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवीन कंपनी, आदित्य बिर्ला लाइफस्टाइल ब्रँड्स लिमिटेड (ABLBL), डिमर्जर पूर्ण झाल्यावर स्वतंत्रपणे सूचीबद्ध केली जाईल. डिमर्जरमुळे ABFRL च्या भागधारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य …

Read More »

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ची योजना आखत आहे, रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. राइड हेलिंग कंपनी प्राथमिक बाजारातून $५ अब्ज मुल्यांकन करून निधी उभारण्याची योजना करत आहे. या संदर्भात, Ola Cabs ची मूळ संस्था ANI Technologies ने गुंतवणूक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य, एपीएमसीच्या जमिनीवर ५ स्टार हॉटेल?

गुजरात उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), सूरत यांना ५-स्टार हॉटेल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी कथित गैरव्यवहार केलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ एप्रिल) नकार दिला. जिल्हा मार्केट यार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही

रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ५४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ …

Read More »

चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाचा पदभार स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वाती म्हसे-पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन १९९३ रोजी उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावर्षी …

Read More »

छगन भुजबळ यांची घोषणा, नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार नाही

नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न लढण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा इशारा, महाराष्ट्र स्वाभिमानी ! तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही

शिर्डीतील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेला आज शिवसेना नेते आमदार आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज सभा झाली. यासभेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख, सुनील शिंदे, लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे उपस्थित होते. या भव्य प्रचार सभेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील …

Read More »

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने …

Read More »

प्रविण दरेकर यांचा पलटवार, शरद पवारांचे ते मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे

अयोध्येतील राम मंदीरावरून आधीच राजकिय आणि सामाजिकस्तरावर विविध मते मतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येतील रामाच्या मुर्तीसोबत सीतेची मुर्ती का नाही असा सवाल उपस्थित करत सबंध महिलांच्या मनात कुतूहुल निर्माण झाल्याचे मत पुणे जिल्यातील एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारपर्यंत १९ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- …

Read More »

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी राष्ट्रपती, सरन्यायाधीश, इस्त्रोचे प्रमुखांचे आवाहन

देशातील प्रथम नागरिक आणि सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पदावरील महनीय व्यक्तींनी गुरुवारी दूरदर्शनच्या माध्यमातून मतदारांना पुढे येऊन भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या काही तास अगोदर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदारांना, विशेषत: प्रथमच मतदारांना मतदानात सहभागी होण्यासाठी आणि देशाचे भविष्य ठरवण्यात योगदान देण्याचे आवाहन …

Read More »